आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली

Spread the love

पुणे : पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरातील भेकराईनगर येथे घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तेजश्री आकाश उदमले (वय २२, रा. शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी आकाश अशोक उदमले (वय २५) याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देऊबाई पांडुरंग नेटके (वय ६५, रा. कोरेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि तेजश्री यांचा मार्च २०१९ मध्ये विवाह झाला होता.

विवाहानंतर आकाशचे एका तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती तेजश्रीला मिळाली. तिने याबाबत आकाशला विचारले असता, आकाशने तिला मारहाण केली आणि तिचा छळ सुरू केला.

यामुळे त्रस्त होऊन तेजश्रीने शनिवारी आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.