आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भरधाव मोटारीने तरुणाला उडवले

Spread the love

पुणे : पुणे-नगर रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीवरील तरुणाला उडवल्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव कुमार (वय २२ वर्षे, रा. वाघोली) आणि त्यांचा मित्र सुधांशु राज (वय २२ वर्षे, रा. युनाइट पी हॉस्टेल, मॅजेस्टिक सिटी सोसायटी, वाघोली) असे मोटारसायकलवरून जात असताना भरधाव कार त्यांच्या अंगावर आली.

या अपघातात जबर ठोसा बसल्याने सुधांशु राज (वय २२ वर्षे) गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करीत आहेत.