आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त पोस्ट टाकू नका

Spread the love

बार्शी : मराठा आरक्षणाबाबत भावना दुखावणाऱ्या पोस्ट कोणीही सोशल मिडीयावर टाकू नका असे आवाहन पोलिसांनी केले असून ,तसे केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी सर्व नागरिकांना दिला आहे.

गणेश चतुर्थी आणि गौरी पूजन असे सार्वजनिक धार्मिक उत्सव चालू आहेत. तसेच सध्या मराठा आरक्षणचा मुद्दा सामाजिक पातळीवर अति संवेदनशील आहे. त्याबाबत समाज माध्यमावर क्रिया व प्रतिक्रियांचे पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत.

कोणत्याही जाती धर्माच्या व समाजाच्या भावना दुखावतील तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे फोटो, मजकूर, ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर (फेसबूक, व्हॉट्सअॅप इंस्टाग्राम व द्विटरवर) पोस्ट करू नये.

अशाप्रकारच्या प्रकारचे कृत्यांना आळा घालण्यासाठी व तात्काळ प्रतिबंध करण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथील विशेष पथकाची सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट इमेज व ऑडिओ क्लिप वर करडी नजर आहे.

अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात येईल. असा इशारा बार्शी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिला आहे.
तसेच नागरिकांनाही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्यही अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच सामाजिक व जातीय सलोखा राखण्यास पोलीस प्रशासन व संबंधित विभागाला सहकार्य करावे. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.