आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गावंठी देशी दारूच्या हातभट्टया पोलिसांनी केल्या उध्दवस्त

Spread the love

सोलापूर : अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून पोलिसांनी१६ हजार लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्टकेले आहे. १६०० लिटर हातभट्टी दारू हस्तगतकरण्यात आली आहे. एकूण 6 लाख 80 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहा जणांना ताब्यात घेण्याची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील मुळेगांव तांडा येथे चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टयाउध्दवस्त करून संबंधीत इसमा विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका,

पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली सोमवारी पोलिसांनी मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टया वर छापे टाकुन कारवाई केली आहे. मिथुन धेनु राठोड (रा.मुळेगाव तांडा), उमेश नामदेव राठोड (रा.मुळेगाव तांडा), रोशन किरण चव्हाण, नागनाथ टोपु राठोड (रा.मुळेगाव तांडा), करण प्रकाश जाधव, गणेश भोजु पवार (रा.मुळेगाव तांडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

चोरून अवैधरित्या चालणाऱ्या गावंठी देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 6 लाख 80 हजार रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला. त्या मध्ये 16 हजार लिटर गुळमिश्रीत रसायन,

80 प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.

या कारवाई मध्ये अन्वये गुन्हा दाखल करून १६०० लिटर हातभट्टी दारू असा एकूण 80 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपी यांच्या रहाते घराच्या आडोशाला चोरून अवैध गावंठी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त केलेल्या ठिकाणी एकूण 3 इसमा विरूध्द 3 गुन्हे दाखल केले असून वरील 4 गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याचेकडुन होत आहे.

चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमा बाबत गोपनियरित्या माहिती प्राप्त करून त्यांचे विरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे.

सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका,

पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, उपनिरीक्षक नागाबाई गंपले, सुनिल बनसोडे, हवेल जाधव, राहुल महिंद्रकर, प्रदीप बनसोडे, श्रीराम आदलिंग, पोना/नागेश कोणदे, लालसिंग राठोड, असिफ शेख, शंकर मुजगोंड, पोलीस अंमलदार किशोर सलगर, वैभव सुर्यवंशी, महिला पोलीस अंमलदार खोत, कुर्ले, भोसले व मसलखांब यांनी पार पाडली आहे.