सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : किरकोळ वादातून पत्नीने रागाच्या भरात पतीचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना मानाजीनगर, न-हे येथे घडली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९ : १५ च्या सुमारास घरगुती वादातून पती-पत्नीचे भांडण झाले.
त्यात रागाच्या भरात हिरादेवी किरपा बिस्ट (रा. स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी बिल्डिंगचे पार्किंगमधील खोली, मूळ गाव- कैलाली, नेपाळ) हिने पती किरपा देवसिंग बिस्ट (वय ४२) यांच्यावर चाकूने वार केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी सुनिल देवकाते (वय २८, रा. मानाजीनगर, न-हे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. हिरादेवीला पोलिसांनी अटक केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.
