आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 10, 2024
Spread the love

पुणे : सात वर्षापासुन नाव बदलुन वेगवेगळया शहरांमध्ये राहत असलेला खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल आहे.

फरार आरोपी सुनिल लक्ष्मण पवार (रा. लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे) हा गुन्हा केल्यापासून गेले ७ वर्षे तो फरार होता. न्यायालयाने त्याचे अटकेबाबत स्टॅडींग वॉरंट काढून सुध्दा तो न्यायालयात हजर झाला नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यास फरार घोषित केले होते.

त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलिस हवालदार बाळू गायकवाड व महेश पाटील यांना फरार सुनिल पवार हा मांडवी पाडा, काशिगाव, (ता. जि. ठाणे) येथे स्वतःचे अस्तित्व लपवुन राहत असल्याची गुप्त खात्रीशीर माहिती मिळाली.

त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, बाळू गायकवाड, महेश पाटील व साईकुमार कारके असे मांडवी पाडा, काशिगाव, येथे वेशांतर करुन गेले. सापळा रचून त्यांनी फरारी असलेला सुनिल लक्ष्मण पवार (वय ३४ वर्षे, रा. सोमनाथ मंडळाजवळ, लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे) हा पळून जात असताना त्यास पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले.

व त्याचेकडे चौकशी करता तो यापुर्वी छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव असे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे नाव बदलुन रहात असलेबाबत सांगितले. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, पोलीस अंमलदार महेश पाटील, साईकुमार कारके, पोलीस हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अजित शिंदे, गणेश गोसावी, अमित गद्रे, नारायण बनकर, महिला पो. हवा. मनिषा पुकाळे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.