आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

किरकोळ वादातून तरुणावर वार

Spread the love

पुणे : किरकोळ वादातून तरुणावर हल्ला करण्याचा प्रकार शुक्रवार पेठेत घडला. याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० : ३० च्या सुमारास काही जणांनी फिर्यादीला त्याच्या स्कूटरवरून सोडण्यास सांगितले. फिर्यादीने त्यास नकार दिला.

तेव्हा फिर्यादीची गचांडी पकडून, “तुला माहीत आहे का आम्ही कोण आहोत? तू परत कसा जिवंत जातोस?” असे म्हणत, कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीवर वार केले आणि गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.