आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नगर रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेने तरुण ठार

Spread the love

पुणे : नगर-पुणे रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेने तरुण ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पळून गेलेल्या टेम्पो चालकाविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरातील पुणे-नगर रस्त्यावर दुपारी दीडच्या सुमारास भरधाव टेम्पोने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी. डी. भोसले करीत आहेत.