आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक

Spread the love

पुणे : ऑनलाइन माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून मॉडर्न कॉलनीतील एका नागरिकाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० एप्रिल ते २२ मे या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादींना एका अनोळखी तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला आणि शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

त्यातून फिर्यादींची ११,२७,००० रुपयांची फसवणूक झाली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करत आहेत.