आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांचा गंडा

Spread the love

पुणे : ऑनलाइन माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून हडपसरमधील एका नागरिकाला १२ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ मे ते ५ जुलै या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींना एका अनोळखी तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला.

शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यातून फिर्यादींची १२,५२,२०० रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.