आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पाण्याच्या टाकीत पडून बालिकेचा मृत्यू

Spread the love

पुणे : कवडे वस्ती, जिनीयस स्कूल वाघोली येथे इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी खोदलेल्या टाकीत पडून सहा वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी ठेकेदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने साईटवरील अर्धवट झालेल्या बांधकामाच्या तळमजल्यावरील टाकीला अपघात होऊ नये म्हणून झाकण लावणे गरजेचे असताना, ते झाकण लावलेले नव्हते.

त्यामुळे शनिवारी (दि. ७ सप्टेंबर) फिर्यादी मुकेश चौहान (वय २९ वर्षे, रा. वाघोली) यांची मुलगी (वय ६ वर्षे) ही टाकीत पडल्याने मयत झाली. फरार ठेकेदाराचा शोध सुरू आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.