आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोर्टातील लिपिक महिलेला धमकावले

Spread the love

पुणे : कोर्टातील कागदपत्रे वेळेत न दिल्यामुळे काम करणाऱ्या लिपिक महिलेला धमकावल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सोमवारी (दि.९ सप्टेंबर) दुपारी ३:३० ते ४ च्या सुमारास घडली. फिर्यादी महिला न्यायालयात काम करते.

“कॉपीसाठी तुमच्याकडे दोन-तीन वेळा पाठवले परंतु सर्टिफाईड कॉपी दिली नाही. तुमच्या फोनवर फोन केला, पण तुम्ही फोनसुद्धा उचलत नाही.

सर्टिफाईड कॉपी द्यायची आहे की नाही? नाही दिली तर तुमची हायकोर्टात तक्रार करतो,” असे धमकावून फिर्यादी महिलेला शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा आणला.

या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विराज पाटील तपास करत आहेत.