सहकारनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रात्रीच्या वेळी चालत जाणाऱ्या नागरिकांना चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकवणाऱ्या ४ विधीसंघर्षीत बालकांकडुन २,६८,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सहकारनगर पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी ऋषीकेश राजेंद्र पाटील हे कोल्हापुर येथुन पुण्याला आले. पहाटे ०३:३५ वा. च्या सुमारास पुणे सातारा रोड येथील डी-मार्ट चौकात ट्रॅव्हल्स मधून उतरून डी-मार्ट समोर मित्राची वाट पाहत थांबले होते.
त्यावेळी अचानक पाठीमागुन एका दुचाकीवर चार अनोळखी इसम आले व गाडीवरून खाली उतरून त्यांना घेरून थांबले. त्याच्या कडून चाकुचा धाक दाखवुन हातातील मोबाईल फोन व बॅग जबरदस्तीने हिसकावुन घेतली व इतर दोन साथीदारांनी पॅन्टचे खिशातील रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली.
या बाबत सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. १५ सप्टेंबर रोजी गुन्हयाचा तपास वरिष्ठ पालीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे तपास करित असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक व अमित पदमाळे यांना त्यांच्या बामतीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्हा करणाऱ्या इसमापैकी एक इसम हा डायस प्लॉट गुलटेकडी येथील कॅनलवर थांबलेला आहे.
त्यास ताब्यात घेवुन त्याच्या कडे सदर गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता सदर विधीसंघर्षीत बालकाने सदरचा गुन्हा त्याच्या इतर तीन विधीसंघर्षीत बालकांसोबत मिळुन केल्याचे कबुल केले. त्यानुसार तीन विधीसंघर्षीत बालकांना पिंपरी येथुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन चोरीस गेलेला मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेला चाकु व एक दुचाकी गाडी तसेच विविध कंपनीचे इतर चार मोबाईल असे एकुण २,६८,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, अमित पदमाळे, अमोल पवार, किरण कांबळे, विशाल वाघ, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, सागर सुतकर, खंडु शिंदे, योगेश ढोले, महेश भगत, सागर कुंभार यांनी केली आहे.
