महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीफ) व माध्यमिक शिक्षक संघ पुणे यांच्या वतीने सन २०२४ चा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार कात्रज येथील स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयाचे प्रा. यशवंत हरिभक्त यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक दिगंबर देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,प्रसिद्ध लेखक शिक्षणतज्ञ यशराज पारखी, टी.डी.एफ. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष जी.के. थोरात, संघटनेचे राज्य विश्वस्त के.एम.डोमसे, पुणे जिल्हा मुखाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चद्र गायकवाड, टी.डी.एफ.संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे, पुणे विभागीय सचिव सचिन दुर्गाडे,
पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, पुणे शहर विद्या सचिव प्राचार्य भानुदास रिठे, टी.डी. एफ संघटनेचे पुणे शहर ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे, प्राचार्य राज मुजावर, मुख्याध्यापिका सौ. आरती राठोड, सचिव भालचंद्र खराईत, पर्यवेक्षक प्रा. हेमंत जाधव, प्रा.संभाजी साबळे, प्रा. मल्लिनाथ वाघमोडे, समुपदेशक प्रा. विजय कचरे प्रा.सौ. हर्षा पिसाळ, प्रा.सौ. मंगल शिंदे व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कात्रज येथील स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयातील यशवंत हरिभक्त हे गेली २३ वर्षापासून मराठी व इतिहास विषयाचे अध्यापन करीत आहेत. ते शाळेतील विविध उपक्रमांमध्ये कार्य कुशलतेने सहभाग घेत आहेत.
त्यांच्या कार्यकुशल कामगिरीमुळे त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर टी.डी.एफ.अध्यक्ष प्रा. संतोष थोरात यांनी तर सूत्रसंचालन सौ. भारती राऊत यांनी केले व सौ. कल्पना कोल्हे यांनी आभार मानले.
