आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

परीवर्तन उद्योग केंद्राला सोलापूर पोलीस अधीक्षकांची भेट

Spread the love

सोलापूर : मुळेगाव तांडा येथील महिलांनी परीवर्तन उद्योग केंद्रामध्ये यावर्षी गणपतीची स्थापना केली होती. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी “परीवर्तन उद्योग केंद्रास भेट दिली. तेथील महिलांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणरायाची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली.

सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन परीवर्तन हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुळेगाव तांडा येथील महिलांना शिलाई मशिनचे प्रशिक्षण देवून तेथे “परीवर्तन उद्योग केंद्र” सुरू केले आहे.

या केंद्रामध्ये २५ ते ३० महिला शिलाई मशिनवर सोलापूर येथील गारमेंट उद्योगाचे कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. परीवर्तन उद्योग केंद्राच्या महिलांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणरायाची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली.

त्यावेळी या केंद्रातील महीलांच्या उद्योगाची माहिती पोलीस अधीक्षक यांनी घेतली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सोलापूर ग्रामीण व मनोज अभंग, सहायक पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हे देखील उपस्थित होते.