स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : कारमधून आणला जात असलेला ६२ किलो गांजासह ४ आरोपींना अटक करण्यात सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.
सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक, तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असल्याने या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग आहेत. या मार्गावरून देशाच्या पूर्व व दक्षीण भागातील राज्यातून प्रतिबंधीत पदार्थ “गांजा” याची छुप्या पध्दतीने वाहतूक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना माहिती प्राप्त होती.
गुन्हे शाखेचे पथक या मार्गावरून होणाऱ्या गांज्याच्या वाहतूकीवर लक्ष ठेवून होते. दि. १६ सप्टेंबर रोजी हवालदार विजयकुमार भरले यांना वैराग पोलीस ठाणेच्या हद्दीतून तुळजापूर ते बार्शी रोडने इनोव्हा कारमधून गांजा वाहतूक होत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यावरून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सपोनि विजय शिंदे व पोउपनि सुरज निंबाळकर यांनी पथकासह आवश्यक ती सर्व कार्यवाही केली. त्यावरून दिनांक १६.०९.२०२४ रोजी हे पथक हे मौजे गौडगाव गावचे शिवारात सापळा लावून थांबले होते.
त्यावरून वेळ १८.३० वा. च्या सुमारास तुळजापूरकडून गौडगावकडे इनोव्हा येत असल्याचे दिसून आले. त्यावेळी सापळा पथकाने कार आडवली. त्यामध्ये एकूण ४ इसम मिळून आले तसेच इनोव्हाच्या कारच्या मागील सीटवर दोन पांढरे रंगाचे पोत्यामध्ये ६२ किलो १३५ ग्रॅम गांजा, ६ मोबाईल, इनोव्हा कार असा एकूण ३०,०४,७००/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदरचा मुद्देमाल हा पंचनामा करून ताब्यात घेतला आहे. सदरबाबत वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्था.गु.शा. यांचेसह सपोनि विजय शिंदे, पोलीस उप निरीक्षक सुरज निंबाळकर, श्रेणी पोलीस उप निरीक्षक राजेश गायकावाड, श्रीकांत गायकवाड, सहा. फौजदार निलकंठ जाधवर, हवालदार विजयकुमार भरले, सलीम बागवान, हरिदास पांढरे, जयवंत सादुल, युसुफ पठाण, पोना धनराज गायकवाड, व्यंकटेश मोरे, पोकॉ समर्थ गाजरे, यश देवकते, विनायक घोरपडे, सुरज रामगुडे, मनोज राठोड, चापोकों राजेंद्र गवेकर, अशोक हलसंगी, सतीश बुरकुल यांनी पार पाडली आहे.
