आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे जिल्ह्यात २६ व २७ रोजी खासगी अवकाश उड्डाणांवर मनाई

Spread the love

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २६ व २७ सप्टेंबर २०२४ रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, २६ सप्टेंबर रोजी पहाटे पासून ते २७ सप्टेंबर रोजी रात्री पर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांवर मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.


या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम २२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.