आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गणपती मंडळातून पूजेच्या साहित्याची चोरी

Spread the love

पुणे : शिवाजीनगर येथील गणेश मंडळामधून पूजेच्या साहित्याची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रणव मेमाणे (वय २५ वर्षे, रा. विठ्ठल मंदिरासमोर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

शिवाजीनगर गणेश मंडळ मनपा पुणे व शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट गणपती चौक गावठाण या गणेश मंडळांमधून गणपती मंडळाचे साहित्य, पितळी धातूची पंचारती, तांब्याच्या धातूचे ताम्हण, तांब्याच्या धातूचा गडवा असा एकूण ५,५००/- रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

पोलिसांनी तातडीने तपास करून सचिन दिंगबर वहाडे (वय ४६, रा. ६०१, कसबा पेठ, गुंडाचा गणपती, पुणे) यास अटक केली आहे. हा तपास पोलीस अंमलदार कल्याण जाधव करीत आहेत.