आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिबवेवाडीतील फ्लॅट फोडून दहा लाखांची चोरी

Spread the love

पुणे : बिबवेवाडीतील फ्लॅट फोडून दहा लाखांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान, भरदिवसा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या प्रकरणी बिबवेवाडीतील ६१ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व्हे नं. ६२९, कोर्णाक गार्डन जी बिल्डिंग, फ्लॅट नं. ०६, बिबवेवाडी येथील फिर्यादी यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना, कोणीतरी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकर तोडून, त्यातून २२,०००/- रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १०,१०,०००/- रुपये किंमतीचा ऐवज चोरी करून नेला. तसेच, साक्षीदार महिलेच्या घरातील ४,०००/- रुपये किंमतीचे चांदीचे पॉलिश केलेले दागिनेही चोरीस गेले आहेत. पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.