आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लायन्स क्लब बार्शीच्या वतीने शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण

Spread the love

बार्शी : लायन्स क्लब बार्शीच्या वतीने यावर्षीचा शिक्षक रत्न पुरस्कार शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. पंडित लावंड , शिवव्याख्याते प्रा. विशाल गरड, प्रा. बालाजी राऊत, मधुकर जाधव, सुधीर खाडे, अनिकेत कारंडे, सुरेशआबा राऊत, आनंद धुमाळ यांना प्रदान करण्यात आला.

बार्शीचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी व लायन्स इंटरनॅशनल चे लिओ प्रांतीय सभापती ॲड विकास जाधव यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष रवींद्र कसपटे होते.

यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लब बार्शीचे सचिव राणाप्रताप देशमुख खजिनदार बालकिशन जाजू लायन्स क्लब बार्शी चेतनाच्या अध्यक्षा अमृता कसपटे सचिव भाग्यश्री देशमुख खजिनदार वर्षा साखरे तसेच लिओ क्लबचे अध्यक्ष अनिकेत जगदाळे प्रशांत पंडित यांची उपस्थिती होती.

यावेळी असिफ तांबोळी यांनी आपल्या मनोगतात शिक्षक हा देशाचे भविष्य घडवणारा असल्यामुळे त्यांचा सन्मान होणे जरुरीचे आहे व लायन्सने ही परंपरा कायम राखलेली आहे असे सांगितले.

विकास जाधव यांनीही आपल्या मनोगतच सत्कारमूर्ती शिक्षकांचे कौतुक करत लायन्स क्लब बार्शीच्या मागील पन्नास वर्षापासूनच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. ळी प्रा. पंडित लावंड विशाल गरड सुधीर खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक रवींद्र कस्पटे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल साखरे यांनी केले. तर आभार राणा प्रताप देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय बंडेवार बापूसाहेब कदम, नंदकुमार कल्याणी, गिरीश शेटे, ओंकार शहाणे, दत्तात्रय कदम, अजय काळे यांनी परिश्रम घेतले.