आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात २ ऑक्टोबर पर्यंत मनाई आदेश लागू

Spread the love

सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि. 18 सप्टेंबर 2024 सकाळी 08 वा पासुन ते 02 ऑक्टोबर 2024 रात्री 08 वा. पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) (अ ते फ) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.