आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून चोरी

Spread the love

पुणे : पर्वती परिसरातील बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून चोरी केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

ही घटना १८ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास मित्रमंडळ परिसरात घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी राहत असलेल्या बंगल्याच्या आवारातील ५० हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड कापून चोरी केली आहे. हा तपास पोलिस अंमलदार प्रवीण जगताप करीत आहेत.