आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घोरपडीत बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरीस

Spread the love

पुणे : घोरपडी परिसरातील एका बंगल्याच्या आवारात असलेले चंदनाचे झाड चोरीला गेल्याची फिर्याद वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

ही घटना १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी राहत असलेल्या घोरपडी बाजार येथील बंगल्याच्या आवारात असलेली ४ हजार रुपये किमतीची चंदनाची दोन झाडे कापून चोरी केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता सांगोलकर करत आहेत.