आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रहेजा ग्रुप तर्फे येरवडा कारागृहाला ७० लाखांची मदत

Spread the love

पुणे : रहेजा ग्रुप तर्फे सामाजिक बांधिलकी जपत, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, अत्याधुनिक रुग्णवाहिका व इतर मूलभूत सोयी-सुविधांसाठी ७०.८१ लाख रुपयांचा सीएसआर फंड कारागृह विभागास देण्यात आला.

त्यानुसार काम सुरू करण्यासाठी पहिला २० लाख रुपयांच्या धनादेश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गोसावी यांच्या हस्ते स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला.

कारागृहातील कैदी आणि अधिकारी-कर्मचारी यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची अभिनव संकल्पना राबविण्यासाठी सुनिल एन. ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पी. पी. कदम, अति. अधीक्षक, सी. आर. सांगळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२ आणि रहेजा ग्रुपचे सहयोगी उपाध्यक्ष नरेंद्र वडनेरे यांनी कामकाज पाहिले.

सदर उपक्रम प्रशांत बुरडे (भा.पो.से.), अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह), महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकल्पनेतून व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमास स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे, नितीन वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे, सुनिल एन. ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा जिल्हा खुले कारागृह, पी. पी. कदम, अति. अधीक्षक, विजय कांबळे, उपअधीक्षक, कौमनि कार्यालय तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.