आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीएमटीबस स्टॅन्डवर महिलेचे मंगळसूत्र पळवले

Spread the love

पुणे : कात्रजच्या पीएमटी बस स्टॅन्डवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला येवलेवाडी येथील रहिवासी आहे. दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास ती कात्रज बसची वाट पाहत उभी होती.


त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ४०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून पळवले.

हा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.