आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मित्रमंडळ चौकाजवळ मंगळसूत्र पळवले

Spread the love

पुणे : मित्रमंडळ चौकाच्या पुढे, पुढारी ऑफिससमोर, फिर्यादी महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील ३०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ६९), पर्वती येथे राहणाऱ्या आहेत.

दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्या स्वारगेटकडे पायी चालत जात होत्या.

त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून पळवले.

हा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग करीत आहेत.