आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

छळास सासरच्या कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Spread the love

पुणे : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहित महिलेच्या आईने (वय ५३, रा. कोंढवा खुर्द) पोलिसात तक्रार दाखल केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता २००९ पासून पती, सासू, नणंद, दिर यांच्यासह आंबेडकर चौक, अहिल्या सोसायटी, येरवडा, पुणे येथे राहत होती.
तिचा वारंवार सासरी छळ होत होता.

पती, सासू, नणंद, दिर यांनी तिला माहेराहून पैसे व सोन्याचे दागिने आणण्याची मागणी करून तिला टोचून बोलत, तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे तिने दि. २० सप्टेंबर रोजी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.