आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लक्ष्मी रोडवर गर्दीत मंगळसूत्र चोरले

Spread the love

पुणे : लक्ष्मी रोडवर खरेदीसाठी आलेल्या वृद्ध महिलेचे गर्दीत मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ६७, रा. अमनोरा पार्क, मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे) दि. १७ सप्टेंबर रोजी पुण्यात खरेदीसाठी आल्या होत्या.

सायंकाळी पाचच्या सुमारास, त्या पतीसह लक्ष्मी रोडवर खरेदी करत असताना, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २,४०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.