चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गॅरेजवर दरोडा टाकून चोरट्यांनी ६९ हजार रुपये लुटल्याची घटना बालेवाडीत घडली आहे. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ७:३० च्या सुमारास घडली. रविराज ऑटोमोबाईल्स अँड वॉशिंग सेंटर, डी. एस. के. गंधकोश इमारतीजवळ, बालेवाडी, पुणे येथे असलेल्या गॅरेजमध्ये तोंड झाकून आलेल्या ९ ते १० इसमांनी तीन वेगवेगळ्या दुचाकींवरून येत हल्ला केला.
त्यांनी लोखंडी हत्यारं आणि लाकडी काठ्यांचा वापर करून फिर्यादींना धमकावले, तसेच गॅरेजमध्ये असलेल्या मॅकेनिक आणि गिऱ्हाईकांनाही हल्ला करून जखमी केले.
चोरट्यांनी फिर्यादींकडील दिवसभराच्या कमाईतून मिळालेली रक्कम, रोख ४९,००० रुपये, इतर व्यक्तींकडील पैसे आणि फिर्यादींचा मोबाईल असा एकूण ६९,००० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला. त्यानंतर चोरटे तिथून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
