हडपसर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर पोलिस स्टेशन आणि पुणे शहर हद्दीत मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या टोळी प्रमुखाला हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. दहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) अश्विनी राख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या सूचनांवरून, हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील मागील १० महिन्यांपासून फरार असलेला आरोपी सुरज ऊर्फ ‘चुस’ बाळू मोहीते (वय २२, रा. सर्व्हे नं. ३१५, माकडेयनगर, अण्णाभाऊ साठे हॉलजवळ, वैदुवाडी, हडपसर, पुणे) याचा शोध घेतला जात होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता आणि अनेक ठिकाणी शोध घेऊन ही तो मिळून येत नव्हता. वेळोवेळी त्याच्या राहत्या पत्त्यावर शोध घेतला गेला, तसेच इतरत्र मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला; परंतु त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
अखेर, हडपसर तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, आणि तपास पथकातील अंमलदार अतुल पंधरकर, अमित साखरे, तुकाराम झुंजार यांनी कौशल्यपूर्ण माहिती गोळा करून, दि. १९ सप्टेंबर रोजी आरोपीला ताब्यात घेतले.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख करत आहेत. ही महत्त्वपूर्ण कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सूचनांवरून तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, आणि इतर पोलिस अंमलदारांनी केली आहे.
या यशस्वी अटकेत सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दीपक कांबळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, निलेश किरवे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
