भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज स्मशानभूमीजवळ अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनुमंत मासाळ, शैलेंद्र साठे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एकजण कात्रज स्मशानभूमीजवळ पिस्तूलसारखे हत्यार कमरेला लावून उभा आहे.
त्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकून कारवाईचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिले.सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, समीर कदम, पोलीस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांनी नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली.
तेथे एक विधी संघर्षग्रस्त बालकाजवळ ३५,०००/- रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आढळले. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर कदम, सपोनि विश्वास भाबड, पोउनि निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचीन गाडे, सतीश मोरे, मितेश चोरमोले, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.
