आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पेट्रोल, डिझेल चोरी प्रकरणी मडीखांबे टोळीवर मकोका कारवाई

Spread the love

पुणे: लोणीकाळभोर येथील टँकरमधील अवैध डिझेल आणि पेट्रोल चोरी प्रकरणातील सूत्रधार प्रविण सिद्राम मडीखांबे (टोळी प्रमुख) आणि त्याच्या ११ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध पेट्रोल आणि डिझेल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान कुंजीरवाडी थेऊर फाटा (ता. हवेली, जि. पुणे) येथे तुकाराम धुमाळ यांच्या घराच्या मागे असलेल्या रिकाम्या जागेतील पत्र्याच्या शेडजवळ टँकर आणून त्यामधून पेट्रोल आणि डिझेल हे ज्वलनशील इंधन बॅरलमध्ये काढले जात असल्याची माहिती मिळाली.

पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस अमंलदार वणवे, धुमाळ, विर, आणि पाटील यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, आय.ओ.सि.एल. आणि एच.पी.सि.एल. असे एकूण तीन इंधन टँकर मिळाले, ज्यामधून इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने डिझेल बॅरलमध्ये काढत असताना आढळून आले.

या छापामध्ये एकूण १,६२० लिटर डिझेल जप्त करण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहराचे राजेंद्र करणकोट यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

सदर घटनेबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान, आरोपी १) शुभम सुशील भगत (वय २३ वर्षे, रा. बोरकरवस्ती थेऊर फाटा), २) तृशांत राजेंद्र सुंभे (वय ३१ वर्षे, रा. बँक ऑफ बडोदा जवळ, थेऊर फाटा), ३) रवी छोटेलाल केवट (वय २५ वर्षे, रा. बोरकरवस्ती, माळीमळा ता. हवेली), ४) विशाल सुरेश गोसावी (वय ३० वर्षे, रा. वाणीमळा थेऊर फाटा), ५) कृष्णा उर्फ किरण हरीभाऊ आंबेकर (वय ३१ वर्षे, रा. कदमवाकवस्ती ता. हवेली), ६) रोहितकुमार छेदुलाल (वय २५ वर्षे, रा. बोरकरवस्ती माळीमळा ता. हवेली), ७) अभिमान उर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय ३५, रा. पांढरी रोड, कन्याशाळेच्या मागे, लोणीकाळभोर), ८) पांडुरंग निळकंठ नकाते (वय ४२ वर्षे, रा. माळीमळा, लोणीकाळभोर), ९) आकाश सुखदेव घोडके (वय २४ वर्षे, रा. हनुमाननगर, कोथरुड), १०) तेजस तुकाराम वाघमारे (वय २३ वर्षे, रा. न्यु शांतीनगर, श्रावणधारा वसाहत, कोथरुड) यांना अटक करण्यात आली आहे.

तसेच, टँकर मालक आणि प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे – टोळी प्रमुख) हे दोन आरोपी फरार आहेत. आरोपी प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे – टोळी प्रमुख) हा लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.

त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, या टोळीने मागील १७ वर्षांत पेट्रोल आणि डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केले आहेत. दाखल गुन्ह्यात मकोका अंतर्भाव करण्यासाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी पोलीस उपआयुक्त परिमंडल ५, पुणे शहर आर. राजा यांच्या माध्यमातून अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्भाव करण्यास अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील यांनी मान्यता दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख या करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन राजेंद्र करणकोट, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस स्टेशन राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन अमोल घोडके, पोलिस अमंलदार रामहरी वणवे, मंगेश नानापुरे, मल्हार ढमढेरे, शिवाजी जाधव, संदीप धुमाळ, बाजीराव विर, योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.