आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शस्त्रासह अटक

Spread the love

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शस्त्रासह अटक करण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून धारदार शस्त्रेही जप्त केली आहेत. एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले असून तीन जण पळून गेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री मुठा नदीच्या काठावर, मांडवी खुर्द स्मशानभूमी येथे छापा टाकला.

त्यावेळी वैभव नारायण गौडी (वय २० वर्षे, रा. वारजे), ओम राजेश व्हावळ (वय २१ वर्षे, रा. साईलिला अपार्टमेंट, वारजे), हर्षल प्रदीप वरघडे (वय २० वर्षे, रा. लक्ष्मी निवास, कॅनॉल रोड, कर्वेनगर) आणि स्वप्निल भगवान कांबळे (वय १९ वर्षे, रा. मावळे आळी, कर्वेनगर) यांना अटक करण्यात आली.

तीन जण पळून गेले, तर एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे. या सर्वांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, मिरची पूड, नायलॉन दोरी, स्क्रू ड्रायव्हर, आणि एक मोपेड असा एकूण ३५,३३०/- रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दिपक चोखोबा कांबळे (पोलीस अमलदार) यांनी फिर्याद दिली आहे. जिल्ह्यात शस्त्रबंदी असताना शस्त्रे बाळगल्याबद्दल तसेच दरोड्याची तयारी केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड तपास करीत आहेत.