मुंढव्यात घर फोडून अडीच लाखाची चोरी
मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रोशन व्हिला, सह्याद्री पार्क, मुंढवा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना १८ ते १९ सप्टेंबरदरम्यान घडली आहे. या प्रकरणी ७८ वर्षीय वृद्धेने फिर्याद दिली आहे. स. नं. ४८/१/२/१, रोशन व्हिला, सह्याद्री पार्क, मुंढवा, पुणे येथील फिर्यादी यांचा राहता फ्लॅट कुलुप लावून बंद असताना, कोणीतरी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला.
बेडरूमचा कडी-कोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ८०,०००/- रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण २,५५,०००/- रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरला. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे करीत आहेत.
