येरवडा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जबरी चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून चोरी केलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री हॉस्पिटलसमोर, शास्त्रीनगर, येरवडा येथे पहाटे ५:२० वाजता फिर्यादी पायी चालत असताना मोटारसायकलवरील अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचा मोबाईल आणि १७,५००/- रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसका मारून चोरली.
याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना, दि. १२ सप्टेंबर रोजी तपास पथकाचे पोलीस अंमलदार अनिल शिंदे, प्रशांत कांबळे आणि स्वप्निल घोलप यांना माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील एक संशयित इसम मांजरी रेल्वे स्टेशनजवळ थांबलेला आहे.
तपास पथकाचे अधिकारी सपोनि सुनिल सोळुंके आणि पोलीस अंमलदार अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, स्वप्निल घोलप, तुषार खराडे, विठ्ठल घुले, सुरज ओंबासे यांनी घटनास्थळी जाऊन संशयित इसमास पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले.
त्याचे नाव पत्ता विचारल्यावर तो विधीसंघर्षित बालक असल्याचे समजले. चौकशी दरम्यान, त्याने चोरी त्याचे इतर तीन साथीदारांसह केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला १५,०००/- रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा, रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विजय अडकमोल यांनी केली आहे.
