आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुचाकीवरील चोरट्यांनी मोबाईल पळवला

Spread the love

पुणे : रात्रीच्या वेळी बालगंधर्व परिसरातून पायी जाणाऱ्या महिलेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी घडली. या बाबत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रात्री साडेदहाच्या सुमारास झाशी राणी चौक परिसरातून जात होत्या. त्याच वेळी, दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि सुसाट पळून गेले. विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असतानाही हा प्रकार घडला. हा तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करीत आहेत.