स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुकुंदनगरमधील बँकेसमोर पार्क केलेल्या कारमधून २० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कात्रज येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० ते संध्याकाळी ४:१५ या वेळेत विद्या सहकारी बँक, मुकुंदनगरच्या समोरील पीएमटी बस स्टॉपजवळ फिर्यादी यांनी त्यांची मोटार कार पार्क करून लॉक केली होती.
अज्ञात इसमांनी मागील डाव्या दरवाज्याची काच फोडून गाडीत असलेली स्काय बॅग, ज्यात रोख २०,००० रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे होती, असा एकूण २०,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे करत आहेत.
