आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

परशुराम विकास आर्थिक महामंडळ स्थापन निर्णयाचे भूममध्ये स्वागत

Spread the love

भुम : राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत परशुराम विकास आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला मान्यता देऊन ब्राह्मण समाजाला गौरवीत करण्यात आले, त्याबद्दल भूम तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र शासनाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

या निमित्ताने 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वा. समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने सरकार अभिनंदन करण्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र आले. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेला मान्यता देणाऱ्या महाराष्ट्र सरकार मधिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच पेढे वाटून, आतिशबाजी करुन समाजाच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला. सरकारने बँकांनाही पत्र देऊन ताबडतोब समाजातील विद्यार्थी, उद्योजक, नवीन उद्योजक यांना अर्थसहाय्य करून त्यांना सधन बनवण्याची प्रक्रिया करावी. अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.

याप्रसंगी भूम तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, भूम शहराध्यक्ष एडवोकेट संजय शाळू ,हेमंत देशमुख, भगवंत देशमुख, अरुण कुलकर्णी, उमाकांत धर्माधिकारी, अंबादास देशपांडे, जनसेवा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीराम मुळे, आनंद बेलसरे, अमोल तुळशी, प्रभाकर अघोर, दत्तन देशमुख, उदय कुलकर्णी, गणेश शास्त्री बावीकर यासह अनेक ब्राम्हण समाज बांधव उपस्थित होते.