आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढवा रोडवर हाणामारीत डोक्यावर वार

Spread the love

पुणे : कात्रज-कोंढवा रोडवर जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत डोक्यावर वार केल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास कृष्णासागर हॉटेलसमोर, कात्रज-कोंढवा रोडवरील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या वडिलांवर हा हल्ला झाला.

फिर्यादी आणि आरोपींमध्ये पूर्वी झालेल्या जुन्या भांडणावरून वाद झाला. त्यानंतर दोन आरोपींनी लोखंडी धारदार हत्याराने “तुला खल्लास करतो,” असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यावर व डाव्या हातावर वार केले.

तसेच, गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या वडिलांवर लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.