आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बेरोजगारांना शासनाचा दिलासा

Spread the love

मुंबई: शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता, अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी ऑनलाईन अर्जासोबत आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला (सक्षम यंत्रणेने दिलेला), आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अर्ज करण्यासाठी ‘Apply’ बटण दाबून अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. अन्यथा नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही.