आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भूमच्या आयटीआय : आता आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था

Spread the love

भूम : भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम याचे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम असे ठेवण्याचा शासनाचा निर्णय जाहीर झाला आहे. या नामांतर सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

राज्य सरकारने महाराष्ट्रातील १४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलून थोर समाजसुधारकांच्या नावांवर ठेवली आहेत. यामध्ये भूम येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव बदलून आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठेवण्यात आले आहे.

या प्रसंगी संस्थेचे आय.एम.सी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, आय.एम.सी सदस्य तथा भाजपाचे विधानसभा अध्यक्ष आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष आणि पत्रकार सुनीलकुमार डुंगरवाल, प्राचार्य हर्षद राजुरकर, संतोष सुपेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी डॉ. शांतीनाथ अंबुरे, शीतलभाई शहा, विवेक पोकर्णा, प्रदीप आहेरकर, सुनीलकुमार दोशी, प्रितम आहेरकर, अनंतकुमार शहा, महावीर भोपलकर, सुधीर जोशी, जितेंद्र बांगर, रवींद्र वीर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मुळे यांनी केले, प्रास्ताविक प्राचार्य हर्षद राजुरकर यांनी सादर केले आणि आभार प्रदर्शन जैन संघटनेचे अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल यांनी केले.