महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिडिया पार्टनर : दांडियाच्या तालावर थिरकणार तरूणाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दांडिया प्रेमींसाठी स्काय एन्टरटेनमेंटच्या वतीने बॉलीवूड दांडिया 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीच्या काळात 12 ऑक्टोबर रोजी बिबवेवाडीच्या यश लॉन्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्याकामाला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिडिया पार्टनर असणार आहे.
या सोहळ्यात दांडिया किंग नैतिक नगाडा सहभागी होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक मानसी देशपांडे, नगरसेवक अभय छाजेड, कमलाबाई कर्नावट, किरण साळी, महाराष्ट्र न्युज नेटवर्कचे संपादक अभिजीत डुंगरवाल उपस्थित राहणार आहेत.
देवीची महती सांगणारी गाणी नटून सजून आलेली तरूणाई जल्लोष, उत्साह आणि मोकळ्या मैदानात गाण्याच्या तालावर थिरकणारे पाय हे चित्र येत्या नऊ दिवसात पुण्यात विविध ठिकाणी पहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड दांडिया २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
यश लॉन्सच्या विस्तीर्ण मैदानावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते १२ वाजेपर्यंत तरूणाईला याठिकाणी बॉलिवूड दांडियामध्ये सहभागी होता येणार आहे. स्काय एन्टरटेनमेंट आयोजित बॉलीवूड दांडियाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे.
नऊ दिवस अखंड देवीचा जागर होत असताना तरूणाईसाठी स्काय एन्टरटेनमेंट देवी भक्तांसाठी दांडिया स्पर्धेची एक अनोखी पर्वणी घेऊन आले आहे. या स्पर्धेमध्ये उत्तम पुरुष डान्सर, उत्तम स्त्री डान्सर, सर्वोत्कृष्ट वेशभुषेसाठी उत्कृष्ट वेशभुषा पुरूष, उत्कृष्ट वेशभुषा स्त्री, उत्कृष्ट जोडी तसेच संघाच्या पातळीवर उत्कृष्ट समूह नृत्य आणि रनर अप समूह अशी बक्षीसे यामध्ये देण्यात येणार आहेत.
हि बक्षिसे वेल्ली व्हिव बेकोन रेसोर्ट महाबळेश्वर, द-फर्न लोणावळा, स्टेपाँन कोसमॅटीक यांच्या वतीने देण्यात येणार आहे. नवरात्रीच्या कालावधीत संपूर्ण पुण्यात होणारा हा सर्वात मोठा दांडिया उत्सव असल्याचे आयोजक आदेश चोरबेले यांनी सांगितले.
आकाश शहा, मृणाल राका, निखिल जैन, शुभम लुणावत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्काय एन्टरटेनमेंटच्या दांडियाला विविध उद्योगसमूहांचे प्रायोजकत्व लाभले आहे. मुख्य स्पोन्सर रविराज रियालिटी, राणावत ग्रुप, जयराज ग्रुप, मॅजेस्टीक ग्रुप, कामधेनु ग्रुप, कृष्णा डाय्ग्नोस्टीक, चोरडिया इन्फ्रास्ट्रक्चर, नीलम मेटल, मास्टर मार्केटिंग, क्यू- टेस्ट, मोहिनी- दिलीप सोनिग्रा, सुहाना, रांका ज्वेलर्स, कोहिनूर ग्रुप, महाराष्ट्र न्युज नेटवर्क, ब्लॅन्को, फोटोग्राफी राजपाल प्रोडक्शन, आय लव्ह लायुनिको, भावना लुकवेल, मानकर डोसा, एच. पी. ज्वेलर्स, कल्याण ज्वेलर्स, यश ट्राव्हल्स, समूल ज्वेलर्स, हॉटेल क्रेझेन्तो, कल्याण भेळ, एस. टू. एस., वर्धमान डेकोर, देविवेल स्टील, भव्या ड्रायफ्रुट, पराठा मंत्र, दुर्गा वूड डेकोर, अभिषेक निंबाळकर आणि सन अॅड स्वयील, बुधानी वेफर्स, मांडोत व्हिल्ला, पराठा मंत्रा, नेल स्पार्क यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
















