आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलाकडून चोरीची तीन वाहने जप्त

Spread the love

पुणे : दुचाकी चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून १ दुचाकी गाडी, १ ऑटो रिक्षा आणि १ चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पोलिसांना रु. १,४५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यातील आरोपीचा व चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध घेत होते. पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, म्हाडा कॉलनी २ नंबर पार्किंगच्या बाजूस, रामनगर, वारजे माळवाडी येथे मोकळ्या मैदानाजवळ चोरलेल्या सॅन्ट्रो कारसह विधीसंघर्षग्रस्त बालक थांबला आहे.

पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून अल्पवयीन मुलाकडून चारचाकी सॅन्ट्रो कार ताब्यात घेतली. आर.टी.ओ. कडून माहिती काढल्यावर ती कार चोरीची असल्याचे स्पष्ट झाले.
विधीसंघर्षित बालकाकडे पालकांसमक्ष अधिक चौकशी केली असता, त्याने १ दुचाकी गाडी व १ ऑटो रिक्षा चोरी केल्याचे सांगितले.

बालकाकडून एकूण ३ वाहने जप्त करून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून रु. १,४५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख, पोलीस अमंलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर यांनी केली आहे.