आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

स्कुल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलींचा लैंगिक छळ

Spread the love

पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून शाळेतील सहा वर्षांच्या दोन मुलींचा लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला. संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदूवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी एका खासगी शाळेत शिकत आहे. चार दिवसांपूर्वी मुलगी शाळेतून घरी आली, तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली.

वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली, तेव्हा विद्यार्थी वाहतूक करणारे संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबरही अश्लील कृत्य करतात, अशी माहिती तिने वडिलांना दिली.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलीला दुचाकीवरून शाळेत सोडले. पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन तिच्या पालकांनाही त्यांनीहि माहिती दिली, तेव्हा आरोपी संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती मुलीने दिली.

मुलीच्या मैत्रिणीच्या पालकांनी मुलीकडे चौकशी केली, तेव्हा आरोपी संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती मुलीने दिली. त्यानंतर वानवडी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.