आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कात्रज घाटात तरुणाचा मोबाईल हिसकावला

Spread the love

पुणे : कात्रज घाटातून पहाटेच्या वेळी पुण्याकडे येणाऱ्या दोन तरुणांचे मोबाईल हिसकावून चोरण्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भिलारेवाडीतील शुभम देवराम तारू यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भिलारेवाडीतील तरुण ५ ऑक्टोबर रोजी पहाटे पुण्याकडे येत होते.

त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी तरुण आणि त्याच्या मित्राचे मोबाईल हिसकावले. पहाटे ५:४५ वाजता कात्रज घाटात आर्यन स्कूलजवळ फिर्यादी आणि त्यांचे मित्र मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना, कात्रज बोगद्याच्या बाजूने आलेल्या इसमांनी त्यांना धमकावून, त्यांच्याकडील १२,०००/- रुपयांचे मोबाईल फोन आणि इतर वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेले. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.