आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

Spread the love

पुणे : खंडणीच्या गुन्ह्यातील १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलीस आणि युनिट-३ गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ मे २०२३ रोजी खंडणी उकळण्याच्या उद्देशाने गाडी अडवून फिर्यादींना गाडीमधून खाली उतरवून चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण करत ५० लाख रुपयांची खंडणी आरोपीने मागितली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तपासादरम्यान निष्पन्न झालेले आरोपी तेजस मधुकर कांबळे (वय २३ वर्षे, रा. पवन मेडिकल शेजारी, बेनकरी वस्ती, धायरी) हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट-३ मधील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पोलीस पथकाने धायरी फाटा येथे सापळा रचून आरोपीला पकडले आणि पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हजर केले.

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस अंमलदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, विनोद जाधव, सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे.