आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नऊ दुर्गा दर्शन यात्रेचा हजारो महिलांनी घेतला लाभ

Spread the love

पुणे : दरवर्षीप्रमाणे कात्रज, सुखसागर नगर, कोंढवा रोड, गोकुळ नगर, संतोष नगरमधील महिला भगिनींसाठी नगरसेविका मनीषा राजाभाऊ कदम यांनी नऊ दुर्गा दर्शन यात्रा आयोजित केली होती.

या यात्रेचा लाभ घेत हजारो महिलांनी आनंद व्यक्त केला. प्रत्येक महिलेला नवरात्रात प्रत्येक देवीचे दर्शन घेण्याची इच्छा असते, परंतु घरातील इतर जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य होत नाही.
त्यामुळे नगरसेविका मनीषा कदम गेली ११ वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे चालवून महिलांना संधी देत आहेत.

आतापर्यंत हजारो महिलांनी या यात्रेत सहभागी होऊन आनंद घेतला आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मनोज बलकवडे, सदाशिव तळेकर, मिलिंद कुंभार, प्रशांत सावंत, ऋषी जाधव, प्रकाश सासवडे, संतोष माने, किरण दिवाडकर या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.