सदरबझार पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : पोलीसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या तीन तासात अल्पवयीन मुलीची सुटकाकरण्यात पोलिसांना यश आले आहे. एका एकवीस वर्षाच्या तरुणाने तिचे अपहरण केले होते,पण दक्ष पोलिसांनी त्याला जलद हालचाली करत अटक केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विठ्ठल भीमसिंग बंबेवाले ( रा. बापूजी नगर सोलापूर) यांची पीडित बालिका (१४ वर्षे ३ महिने) हिचे सोबत दोन महिन्यापासून लग्न लावून द्या म्हणून जय दीपक बोकेवाले (वय २१ वर्ष, रा. बापूजी नगर) हा मागे लागला होता.
व सारखा तिचा पाठलाग करत होता. दरम्यान मुलीचे वडील हे आरोपी यास बोलू देत नसल्याने आरोपीने सदर पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन पीडित मुलीच्या वडिलांशी वाद घातला व पीडित मुलीला जबरदस्तीने रात्री 10:30 च्या सुमारास पळवून नेले.
पीडित मुलींच्या घरच्या लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यांनी सदर बाजार पोलीस ठाणे येथे येऊन पोलीसांना हकीकत सांगितली. पीडित महिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे, महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध कठोर पावले उचलणे तसेच बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आधीच आदेश दिले होते.
सदर बझार पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष पापडे यांनी गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून सोबत पोलीस कॉन्टेबल उमेश चव्हाण यांना सोबतीला घेऊन घटना घडल्यापासून अवघ्या तीन तासात अल्पवयीन बालिकेचे अपहरण करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद केले व आरोपीच्या ताब्यातून पीडित बालिकेची सुटका केली.
सरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये सदर बजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, दुय्यम पोलीस निरीक्षक ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पापडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण यांनी पार पाडली.
