आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

पुणे : मार्केटयार्ड परिसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी २४ तासांच्या आत बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२४ रोजी सावित्री हॉटेलसमोर शेडमध्ये आणि येवले चहाच्या समोर, मार्केटयार्ड, पुणे येथे बाळासाहेब रणदिवे यांना व्हॉट्सअॅप वर पाठवलेल्या मेसेजमुळे राहुल खुडे, त्याचा भाऊ सचिन खुडे, एक सरदारजी आणि एक अज्ञात आरोपी यांनी कोयत्याने वार करून खून केला होता.

या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अमंलदार घेत होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी कात्रज घाटातून साताऱ्याच्या दिशेने निघून जाणार आहेत.

तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी कात्रज घाटात सापळा रचून १) राहुल दत्तात्रय खुडे (वय ४० वर्षे, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी, पुणे), २) सचिन दत्तात्रय खुडे (वय ३४ वर्षे, रा. सदर) आणि ३) सुरजसिंग दिलीपसिंग दुधानी (रा. सदर) यांना कात्रज घाटातून पाठलाग करून ताब्यात घेतले.

आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांचे यापूर्वी देखील खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे आणि अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.