आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नव्या सात पोलीस स्टेशनला मिळाले नवीन कारभारी

Spread the love

पुणे : विजयादशमीच्या मुहूर्तावर पुणे शहरात सात नवीन पोलीस स्टेशन शुक्रवारी सुरू करण्यात आली असून, त्याठिकाणी नव्या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या फुरसुंगी, खराडी, आंबेगाव, काळेपडळ, बाणेर, वाघोली, नांदेडसिटी पोलीस स्टेशनच्या नवीन कारभारी मिळाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्यांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखता येणार आहे.

  • महेश बोळकोटगी (व.पो.नि., चतुःशृंगी पोलीस ठाणे ते व.पो.नि., बाणेर पोलीस ठाणे)
  • शरद झिने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ ते व.पो.नि., आंबेगाव पोलीस ठाणे)
  • अतुल भोस (पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड ते व.पो.नि., नांदेडसिटी पोलीस ठाणे)
  • संजय चव्हाण (व.पो.नि., चंदननगर पोलीस ठाणे ते व.पो.नि., खराडी पोलीस ठाणे)
  • विजयानंद पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चतुःशृंगी ते व.पो.नि., चतुःशृंगी पोलीस ठाणे)
  • अनिल माने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंदननगर पोलीस ठाणे ते व.पो.नि., चंदननगर पोलीस ठाणे)
  • पंडित रेजितवाड (व.पो.नि., लोणीकंद पोलीस ठाणे ते व.पो.नि., वाघोली पोलीस ठाणे)
  • सर्जेराव कुंभार (पोलीस निरीक्षक (गुन्हे), विमानतळ ते व.पो.नि., लोणीकंद पोलीस ठाणे)
  • मंगल मोंढवे (व.पो.नि., बिबवेवाडी पोलीस ठाणे ते व.पो.नि., फुरसुंगी पोलीस ठाणे)
  • शंकर साळुंखे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते व.पो.नि., बिबवेवाडी पोलीस ठाणे)
  • मानसिंग पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस ठाणे ते व.पो.नि., काळेपडळ पोलीस ठाणे)
  • राहुल गौड ( पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस ठाणे)
  • अमर काळंगे ( पोलीस निरीक्षक (गुन्हे), हडपसर पोलीस ठाणे)
  • राजेंद्र पन्हाळे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चतुःशृंगी पोलीस ठाणे)